Thursday, November 09, 2006

वडापाव

त्याला वडापाव आवडत नाही
तिला वडापाव आवडतो
तिने वडापावचा हट्ट धरताच

तो सॉलिड भडकतो
अरबट चरबट खाण्यापेक्षा
सुकी भेळ का खात नाहीस
त्याचे असले गोल फंडे
तिला खरंच कळत नाहीत

वडापाव is unhelthy
वडापाव is junk food
वडापाव is tempting
वडापाव tastes so good

वडापाव पोट बिघडवतो
तरीही तु त्याच्यासठी इतकी वेडी
कधी खात तर नाहीस
मग तुला काय कळणार आहे त्यातली गोडी

वडापाव फुकटचं खाणं
काहीतरी आपलं तेलकट उगाच
मन आणि पोट कसं त्रुप्त होऊन जातं
एक वडापाव पोटात जाताच

दरवेळी फिरायला गेल्यावर
दोघांचं हे असं होतं
खाण्यावरुन भांडण होऊन
वेटर समोर हसं होतं

वडापाव आवडत नसला तरी
पाणीपुरी त्याला आवडते
मग पाणीपुरी तरी healthy कशी
यावर तिही झगडते

चिडुन मग ती रुसुन राहते
फुगून बसते पुरीसारखी
त्याचं तिचं भांडण असं
आंबट गोड चटणीसारखं

0 Comments:

Post a Comment

<< Home

ur number
cerebral palsy